
कुसुंबा बुद्रुक गावाजवळील शेती शिवारात बिबट्यासह पिल्ले ; गावकरी व शेतकऱ्यांमधे भीतीचे वातावरण
रावेर प्रतिनिधी
तालुक्यातील कुसुंबा बुद्रुक गावाजवळील शेती शिवारात केळीच्या बागेत बिबट्याचा काही दिवसांपासून वावर असून त्याने दोन दिवसा पूर्वि रानडुकराचा फडशा पाडला. यामुळे शेतकरी व मजुर वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे .
गेल्या पंधरा दिवसांपासून कुसुंबा शेती शिवारात बिबट्याचा वावर आहे. दि. २४ रोजी या बिबट्याने रानडुकराचा फडशा पाडला होता. सदर बिबट्या गावाजवळील स्मशानभूमीच्या परिसरातील केळीच्या बागेत असल्याची गावकऱ्यांमधे जोरदार चर्चा सुरू आहे . शेतकरी.मजूरांसह शेतांमध्ये शेती शिवारात मोठी वर्दळ असते. त्यातच सध्या स्थितीत बिबट्या गावकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या नजरेस पडल्याने गावकरी आणि शेतकऱ्यांमधे भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्याचा शोध घेऊन जेरबंद करावे अशी परिसरातील शेतकरी, मजुर आणि गावकऱ्यांकडुन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम