कुसुंबा येथे तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा...

कुसुंबा येथे तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात एका ४२ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दि. १५ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश गायकवाड (वय ४२, रा. कुसुंबा, ता. जळगाव) हे एमआयडीसी परिसरातील एका खाजगी कंपनीत नोकरीस होते. मंगळवारी (दि. १५) रात्री सुमारास त्यांनी आपल्या कुटुंबासह जेवण केले व नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी खोलीत गेले. रात्री सुमारे दहा वाजता त्यांचा मोठा मुलगा राहुल खोलीत गेला असता, त्यांना वडील खोलीत दिसले नाहीत.

त्याने घराच्या मागील बाजूस पाहणी केली असता, प्रकाश गायकवाड हे निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. हे दृश्य पाहताच मुलाने आक्रोश केला. आवाज ऐकून शेजारी आणि ग्रामस्थांनी धाव घेतली व तातडीने त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

घटनेच्या वेळी त्यांची पत्नी छाया गायकवाड या माहेरी गेल्या होत्या, तर लहान मुलगा कामानिमित्त हॉटेलवर गेला होता. प्रकाश गायकवाड यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम