कु. श्रद्धा पाटील यांचा सत्कार; आदित्य बिर्ला, मुंबई येथे मॅनेजर पदावर नियुक्ती

बातमी शेअर करा...

कु. श्रद्धा पाटील यांचा सत्कार; आदित्य बिर्ला, मुंबई येथे मॅनेजर पदावर नियुक्ती

भुसावळ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील यांच्या हस्ते डॉ. कैलास पाटील (कोजगांवकर) यांची सुकन्या कु. श्रद्धा कैलास पाटील हिचा सत्कार करण्यात आला.

कु. श्रद्धा पाटील हिने जमनालाल बजाज संस्थेतून एमबीए (९९.५ टक्के) गुणांसह उत्तीर्ण होऊन आदित्य बिर्ला, मुंबई येथे मॅनेजर पदावर यशस्वी नियुक्ती मिळवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नवलसिंगराजे पाटील यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

या वेळी कवी प्रफुल नाना वडनगरीकर, संजय पाटील (झुरखेडा) आणि चंद्रशेखर पाटील (पिंप्रीसेकम) हे मान्यवरही उपस्थित होते. उपस्थितांनी श्रद्धाच्या उज्वल भविष्याची शुभेच्छा देत, तिच्या यशाचे कौतुक केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम