कृषी अधिकाऱ्यांच्या कारला दुचाकीची धडक, ४० हजार रुपयांचे नुकसान

बातमी शेअर करा...

कृषी अधिकाऱ्यांच्या कारला दुचाकीची धडक, ४० हजार रुपयांचे नुकसान

जळगाव: नातेवाईकांना घेण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे जात असलेल्या कृषी अधिकारी प्रतिक्षा विठ्ठलराव सोनवणे (वय ४३, रा. प्रज्ञा कॉलनी) यांच्या कारला एका दुचाकीस्वार महिलेने धडक दिली. यात कारचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

ही घटना ५ सप्टेंबर रोजी दुपारी कांताई नेत्रालयाजवळ घडली. प्रतिक्षा सोनवणे त्यांच्या (एमएच १९, सीझेड ६६१०) या क्रमांकाच्या कारने जात असताना, नितीन महेंद्र पाटील (एमएच १९, सीए ५५९१) या दुचाकीस्वार महिलेने अचानक रस्त्यावर येऊन त्यांच्या गाडीला धडक दिली.

या प्रकरणी प्रतिक्षा सोनवणे यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, दुचाकीस्वार महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कैलास इंगळे करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम