
कृष्णानगर येथे घरफोडी करणाऱ्यास पोलिसांची अटक
कृष्णानगर येथे घरफोडी करणाऱ्यास पोलिसांची अटक
३० हजारांचा ऐवज हस्तगत; चाळीसगाव पोलिसांची कारवाई
चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील कृष्णानगर (तळेगाव) येथील अंगणवाडी सेविका सरलाबाई साईदास चव्हाण यांच्या घरातून ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी त्याच परिसरातील एकाला ताब्यात घेतले असता त्याने चोरीची कबुली दिली आणि चोरलेले दागिने परत केले.
सरलाबाई चव्हाण यांच्या सासूचे सोन्याचे दागिने घरातील लोखंडी पेटीत ठेवलेले होते. अज्ञात चोरट्याने पेटीतून ३ ग्रॅम सोन्याचे पदक व ४ मणी असा ऐवज चोरून नेला होता. या घटनेनंतर संशयाच्या आधारे समोरच राहणाऱ्या भाईदास प्रल्हाद चव्हाण (वय २८) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली देत ऐवज परत केला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार युवराज नाईक, हवालदार गणेश चव्हाण, दीपक नरवाडे, पोलीस नाईक तुकाराम चव्हाण व संदीप पाटील यांनी केली. पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम