कॅलिफोर्नियाच्या आगीतील बळींचा आकडा १६ वर

आगीचा प्रसार वेगाने ; नागरी व वन्यजीवांचा धोका आणखी वाढला

बातमी शेअर करा...

कॅलिफोर्नियाच्या आगीतील बळींचा आकडा १६ वर
आगीचा प्रसार वेगाने ; नागरी व वन्यजीवांचा धोका आणखी वाढला
लॉस एंजलिस:I वृत्तसंस्था

अमेरिकेच्या कैलिफोर्नियातील वणव्यात मृतांची संख्या रविवारी १६ झाली आहे. मृतांमधील ५ जण पॅलिसेड्स तर १९ जण इंटॉन प्रांतातील आहेत, अशी माहिती स्थानिक आरोग्य अधिकान्यांनी दिली आहे. येथे सध्या सोसाट्याचा वारा सुटला आहे. त्यामुळे आगीचा प्रसार वेगाने होत असून, नागरी व वन्यजीवांचा धोका आणखी वाढला आहे. अशातच जंगलातील आगीने राजधानी लॉस

एंजलिसला पूर्णपणे कवेत घेतले आहे. परिणामी १३ लाख कोटीचे नुकसान झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. कॅलिफोर्नियाच्या जंगलात गेल्या ६ दिवसांपूर्वी आगडोंब उसळला आहे. लढाऊ विमाने व हेलिकॉप्टरच्या मदतीने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अद्यापही ही आग नियंत्रणात आलेली नाही. असंख्य इमारतीची राखरांगोळी झाली असून, शेकडो बग्न्यजीवांना प्राण गमवावा लागला आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम