केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी पंतप्रधान यांच्या सभास्थळाची केली पाहणी

लखपती दीदी च्या भव्य मेळाव्यानिमित्त 25 ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जळगावात

बातमी शेअर करा...

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी पंतप्रधान यांच्या सभास्थळाची केली पाहणी

लखपती दीदी च्या भव्य मेळाव्यानिमित्त 25 ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जळगावात

जळगांव l प्रतिनिधी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२५ ऑगस्ट २०२४, रविवार रोजी जळगांव येथे “लखपती दीदी” चा भव्य मेळावा संपन्न होणार आहे.

केंद्रीय

या पार्श्वभूमीवर मेळाव्याच्या नियोजन बाबत जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित नियोजन बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी तयारीचा आढावा घेतला,

तसेच सर्व अधिकारी यांच्यासह सभा स्थळाची पाहणी करून नियोजनाबाबत महिती घेतली व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह विभागीय आयुक्त नाशिक प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधिक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी,

म.न.पा. आयुक्त ज्ञानेश्वर दत्तात्रय ढेरे, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, प्रभाकर शिंदे तसेच जळगांव माजी महापौर सौ.सिमाताई भोळे व भाजपा जळगांव महानगर अध्यक्ष सौ.उज्वलाताई बेंडाळे ई. उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम