
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे आणि खासदार स्मिताताई वाघ यांची जळगावमधील CBSE कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे आणि खासदार स्मिताताई वाघ यांची जळगावमधील CBSE कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट
जळगाव, विवेकानंद प्रतिष्ठानच्या काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये आयोजित CBSE क्लस्टर ९ कबड्डी स्पर्धा २०२५ ला आज केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री मा. श्रीमती रक्षाताई खडसे आणि मा. खासदार सौ. स्मिताताई वाघ यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा देऊन त्यांचे मनोबल वाढवले.
या महत्त्वाच्या प्रसंगी केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत दादा अमळकर, क्षुधा शांतीचे अध्यक्ष श्री. संजयजी बिर्ला, विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, विवेकानंद प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा व काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलच्या शालेय समिती प्रमुख सौ. हेमाताई अमळकर, सचिव विनोद पाटील, सहसचिव दिलीप महाजन यांच्यासह प्रतिष्ठानचे अन्य व्यवस्थापकीय सदस्य उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री मा. रक्षाताई खडसे यांनी स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आणि शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल कौतुक केले. CBSE स्तरावरील अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर आपले कौशल्य दाखवण्याची उत्तम संधी मिळते, असे महत्त्वाचे उद्गार त्यांनी काढले.
या कबड्डी स्पर्धांचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा २८ जुलै रोजी होणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम