केळी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून पैशांची मागणी

पोलीस अधीक्षकांनी तीन पोलिसांना केले निलंबित

बातमी शेअर करा...

केळी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून पैशांची मागणी

पोलीस अधीक्षकांनी तीन पोलिसांना केले निलंबित

जळगाव (प्रतिनिधी): केळी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून अवैधपणे पैसे उकळणाऱ्या पोलिस नाईक पवनकुमार विष्णू पाटील, सहायक फौजदार गुलाब हिलाल मनोरे आणि पोलीस हवालदार चेतन चंद्रमोहन सोनवणे यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी ही कठोर कारवाई केली आहे.

पाचोरा पोलिस ठाण्यात नियुक्त असलेल्या पोलिस नाईक पवनकुमार पाटील, सहायक फौजदार गुलाब मनोरे आणि पोहेकॉ. चेतन सोनवणे यांच्यावर वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी होती.

दि. ३० मार्च २०२५ रोजी कजगावहून पाचोरा येथे केळी वाहतूक करणारे वाहन जामनेर मार्गे जात असताना या पोलिसांनी वाहन अडवले.
वाहनचालकाने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने ‘५० ची लायकी आहे का?’ असा अपमानास्पद सवाल पोलिस नाईकाने केला.
याच वेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या इतर पोलिसांनीही आणखी एक वाहन अडवून पैसे घेतल्याचा व्हिडीओ एका प्रत्यक्षदर्शींने शूट करून व्हायरल केला.व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी याची गंभीर दखल घेत तिघांवर निलंबनाची कारवाई केली.
तसेच, पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांमार्फत त्यांच्यावर खात्यांतर्गत चौकशी होणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.
या प्रकारामुळे पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असून वाहनचालक आणि व्यापार्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम