
केसीईत बालनाट्य दिनानिमित्त ‘कान्ह कला कट्ट्याचे’ उद्घाटन
केसीईत बालनाट्य दिनानिमित्त ‘कान्ह कला कट्ट्याचे’ उद्घाटन
जळगाव (प्रतिनिधी) – केसीई सोसायटी संचालित विविध शाळांमध्ये ‘बालनाट्य दिना’चे औचित्य साधून ‘कान्ह कला कट्ट्याचा’ शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या बहुआयामी कलागुणांना चालना मिळणार असून, यामाध्यमातून नृत्य, नाट्य, गायन, वादन, चित्रकला, शिल्पकला, अभिनय आदी कलांचे सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे.
‘कान्ह कला कट्ट्या’चे उद्घाटन केसीई सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, कान्ह ललित कला केंद्राचे समन्वयक प्रसाद देसाई आणि ए. टी. झांबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत ए. टी. झांबरे विद्यालय, प. वि. पाटील विद्यालय, ओरियन स्टेट बोर्ड शाळा, सीबीएसई विद्यालय आणि किलबिल बालक मंदिर या शाळांतील विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे.
विशेष म्हणजे, शनिवारचा दिवस ‘दप्तराविना व आनंददायी शनिवार’ म्हणून साजरा केला जाणार असून, विद्यार्थ्यांना कलेच्या सहज आणि सर्जनशील अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
उपक्रमासाठी विषयतज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, नृत्य – अजय शिंदे, वादन – देवेंद्र गुरव, अभिनय – वैभव मावळे, चित्रकला – पुरुषोत्तम घाटोळ हे कला गुरू मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमावेळी उपशिक्षक योगेश भालेराव, चंद्रकांत कोळी यांच्यासह अन्य शिक्षकवृंदांची उपस्थिती होती.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम