केसीई सोसायटीच्या स्थापनेला ८१ वर्षे; १६ सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

बातमी शेअर करा...

केसीई सोसायटीच्या स्थापनेला ८१ वर्षे; १६ सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) – केसीई सोसायटीने आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात १९४४ मध्ये केली. गेल्या आठ दशकांहून अधिक काळात संस्थेने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा दिली आहे. या यशस्वी वाटचालीच्या ८१ वर्षांच्या निमित्ताने दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश बी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी संचालक फडणवीस, डॉ. मृणालिनी, प्राचार्य भारंबे आणि प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर उपस्थित होते. कार्यक्रम सकाळी ९.४५ वाजता केसीई संस्थेच्या प्रांगणात पार पडणार आहे. यामध्ये संस्थेच्या सर्व महाविद्यालयांनी प्रथमच एकत्र येऊन आपल्या वाटचालीचा आढावा विविध माध्यमांतून सादर करणार आहेत.

कार्यक्रमात एकूण १७ शाळा व महाविद्यालयांद्वारे सांस्कृतिक आणि शैक्षणिक सादरीकरण होणार असून, विशेष अतिथी म्हणून कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी उपस्थित राहणार आहेत. तसेच उपकुलगुरू डॉ. एस.टी. इंगळे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील भूषवणार आहेत.

या प्रसंगी केसीई सोसायटीच्या गौरवशाली इतिहासाची झलक दाखवणारी विशेष चित्रफीत सादर केली जाणार आहे. त्यातून संस्थेने राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुरूप अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान, कला, वाणिज्य, भारतीय ज्ञान प्रणाली, भारतीय संगीत, रिफ्लेक्सोलॉजी, निसर्गोपचार आणि योग विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची केलेली भरघोस कामगिरी समोर येणार आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम