
के के उर्दू गर्ल्स हायस्कूलमध्ये गाईड विभागातर्फे”चिंतन दिवस”साजरा
बेडेन पावेल यांचे जीवनचरित्र सादर
के के उर्दू गर्ल्स हायस्कूलमध्ये गाईड विभागातर्फे”चिंतन दिवस”साजरा
बेडेन पावेल यांचे जीवनचरित्र सादर
जळगांव प्रतिनिधी
येथील अंजुमन ए खिदमत ए खल्क संचलित के के उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये दिनांक 22/02/2024 रोजी स्काऊट गाईड चे संस्थापक बेडेन पावेल व लेडी बेडेन पावेल यांचे जन्म दिनानिमित्त “चिंतन दिवसाचे”आयोजन ज्येष्ठ शिक्षिका शकीला शेख यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले.
या वेळी इयत्ता नववी ची विद्यार्थिनी मरियम शेख नूर मोहम्मद ने उपस्थित विद्यार्थ्यांनींना स्काऊट गाईड ची प्रतिज्ञा दिली तर ज़ोया ज़ुबेर अहमद खान ने स्काऊट गाईडस चे संस्थापक बेडेन पावेल यांचे जिवन परिचय देऊन गाईड्स चे नियम,सिध्दांत व सेवा पध्दती स्पष्ट केली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी गाईड्स शिक्षिका नसरीन काद्री,समीना शेख ने परिश्रम घेतले.सूत्रसंचालन इरम शेख फरमान यांनी केले.तर आभार फिरदौस शेख जावेद यांनी व्यक्त केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम