के सी इ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत अध्ययन आणि अध्यापन   कार्यशाळा

बातमी शेअर करा...

के सी इ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत अध्ययन आणि अध्यापन   कार्यशाळा

जळगाव – विद्यार्थी वर्गात येण्यासाठी प्रेरित होऊन त्याने अभ्यास केला पाहिजे आणि स्वविकासाचा कर्ता झाला पाहिजे यासाठी शिक्षकाने टीचिंग व लर्निंगचे काही कौशल्ये आत्मसात केली पाहिजे हि काळाची गरज आहे.त्यासाठी अध्ययन आणि अध्यापन हि पंचसूत्री समजून घेतली पाहिजे असे केसीई संस्थेच्या शैक्षणिक संचालिका माजी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट जळगाव येथे प्राध्यापकांना अध्ययन आणि अध्यापन मध्ये प्रेरित होण्यासाठी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मनोगत व्यक्त केले.यावेळी  करियर कट्टा समन्वयक डॉ. शमा सराफ, प्राचार्य डॉ. संजय सुगंधी उपस्थित  होते . त्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐर्नजाइजर द्वारे प्राध्यापकांच्या नावावरून व विशेषणाचा वापर करून त्यांचे गुण सांगितले.प्रत्येक प्राध्यापकाला चॉकलेट देऊन त्या रॅपरचा नाविन्यपूर्ण वापर करण्यास सांगितले , शैक्षणिक स्थिती यावर उतारा देऊन त्याला सर्वांचे समोर विश्लेषण करण्यास सांगितले. त्यातून केस स्टडी चा कसा वापर करायचा ते सांगितले. ब्रेन स्टोर्मिंगचा उपयोग अध्ययन आणि अध्यापनात करण्यास सांगितले . डॉ. मृणालिनी फडणवीस या सोलापूर विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रुतिका घरडे (एच आर विभाग प्रमुख) तर आभारप्रदर्शन प्रा स्नेहा पाटील यांनी केले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम