
के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (स्वायत्त )महाविद्यालयांत ८ ऑगस्ट रोजी ‘ मुंबई डबेवाला ‘ यांचे प्रेरणादायी व्याख्यान
के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (स्वायत्त )महाविद्यालयांत ८ ऑगस्ट रोजी ‘ मुंबई डबेवाला ‘ यांचे प्रेरणादायी व्याख्यान
जळगाव– खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत दिनांक ८ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई मधील डबेवाला असोसिएशन चे अध्यक्ष श्री सुभाष तळेकर यांचे नवीन सभागृहात प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन केले आहेत .
डबेवाले हे मुंबई शहरातील नोकरदारांचे जेवणाचे डबे घरापासून कामाच्या जागेपर्यंत नेण्याचे काम करतात. डबे पोहचवण्याचे काम ऐकण्यास सोपे वाटत असले तरी मुंबईसारख्या अवाढव्य शहरात ज्या अचूकतेने हे काम केले जाते त्या कारणाने मुंबईचे डबेवाले संशोधकांच्या अभ्यासाचा विषय झाले आहेत.अश्या पद्धतीने कुठल्याही आधुनिक कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर न करता डबे वितरणाचे काम अचूकपणे करणाऱ्या संस्थेच्या व्यस्थापनाचे धडे घेण्याची उत्सुकता सर्वाना असते हेच धडे जाणून घेण्यासाठी डबेवाल्यांचं पूर्ण व्यवस्थापन त्यांचं जीवन राहणीमान यावर प्रकाश टाकण्यासाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यांकरिता व्याख्यानाचे आयोजन केले आहे .हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम