के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट (स्वायत्त ) महाविद्यालयांत मॅनेजमेन्ट गुरु डबेवाला यांचे व्याख्यान संपन्न

बातमी शेअर करा...

के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट (स्वायत्त ) महाविद्यालयांत मॅनेजमेन्ट गुरु डबेवाला यांचे व्याख्यान संपन्न

जळगाव –खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत व्यवस्थापन विभागातर्फे मॅनेजमेंट गुरु अर्थात मुंबई डब्बेवाला असोसिएशनचे अध्यक्ष श्री सुभाष तळेकर यांचे प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झाले . कार्यक्रमाचे सुरुवातीला व्यासपीठावर उपस्थित मुंबई डब्बेवाला असोसिएशन चे अध्यक्ष श्री सुभाष तळेकर,के सी ई संस्थेच्या शैक्षणिक संचालिका व सोलापूर विद्यापीठाच्या माजी कुलगुरू प्रा.डॉ .मृणालिनी फडणवीस ,के सी ई संस्थेचे कोषाध्यक्ष श्री शशिकांत वडोदकर ,के सी ई आय एम आर संस्थचे संचालिका डॉ शिल्पा बेंडाळे , ऍडव्होकेट तथा सहसचिव श्री प्रवीणचंद्र जंगले , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी या मान्यवरांचे हस्ते कार्यक्रमाचे सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन झाले . मुंबई डबेवाला अर्थात श्री सुभाष तळेकर यांनी प्रेरणादायी गोष्टीचा समावेश केला आहे. यामध्ये डबेवाल्यांचा पूर्ण इतिहास, त्यांचा पोशाख, त्यांची सेवा, त्यांचं व्यवस्थापन आणि वितरण प्रणाली यावर विशेष लक्ष केंद्रित केलं डबेवाल्यांचं पूर्ण व्यवस्थापन त्यांचं जीवन राहणीमान यावर या धड्यामध्ये प्रकाश टाकण्यात आला . मुंबईतील डबेवाल्यांची कीर्ती सातासमुद्रापार आहे. मुंबईतील डबेवाल्यांचा इतिहास फार रंजक असून कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांची सेवा थांबत नाही. लाखो लोकांना वेळेवर डबे पोहोचवण्याचं काम ते करत असताना त्यांचं व्यवस्थापन व कार्यप्रणाली हे दखलपात्र आहे.व्यवस्थापन कौशल्याने डबेवाले काम करतात . जसं जसं डबेवाले काम करत गेले तसं तसं व्यवस्थापनाचे उच्चांक आपोआप घडत गेले. गिनिजबुकात डबेवाल्यांची नोंद झाली.सिक्स सिग्मा मिळाला ISO प्रमाणपत्र मिळाले. दिवसाला २ लाख डबे घरातुन कार्यालयात व जेवून रिकामी झालेले २ लाख डबे पुन्हा घरी पोचवायचे म्हणजेच दिवसाला ४ लाख डब्यांची देवाण घेवाण डबेवाले करतात. चर्चगेट ते विरार व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण व नवी मुंबई या दरम्यान ५ हजार डबेवाले काम करत आहेत.अश्या अडचणीच्या व्यवस्थापनातून त्यांना वेळेचे व्यवस्थापन , टीम लीडर ,संभाषण ,संवाद कौशल्य ,शिस्त ,या टिप्स त्यांनी सांगितल्या . या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी तसेच शहरातील नागरिक विद्यार्थी उपस्थतीत होते . कार्यक्रमाला म्युझिक क्लब ची मदत लाभली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा श्रुतिका घरडे तर आभार प्रदर्शन प्रा हर्षा देशमुख यांनी केले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम