
कै. पी. के. शिंदे विद्यालयाचे ९ विद्यार्थी NMMS शिष्यवृत्तीस पात्र
शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक
कै. पी. के. शिंदे विद्यालयाचे ९ विद्यार्थी NMMS शिष्यवृत्तीस पात्र
शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक
पाचोरा (प्रतिनिधी) – राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS – National Means-cum-Merit Scholarship) २०२४–२५ मध्ये कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयाच्या ९ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत शिष्यवृत्तीस पात्रता मिळवली आहे.
राष्ट्रीय परीक्षा परिषद, नवी दिल्ली (NCERT) मार्फत ही परीक्षा २४ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आली होती. गिरणाई शिक्षण संस्था संचलित या विद्यालयातून इयत्ता ८वीचे एकूण ३७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यातील ९ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावरील गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शिष्यवृत्ती पात्रता मिळवली.
शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांची नावे
मानसी रविंद्र महाजन, गार्गी भालचंद्र कोठावदे, वेदांत भाऊसाहेब पाटील, वेदांती रविंद्र चौधरी, वेदिका शरद महाजन, भाविका विष्णू ठाकूर, डिंपल सुगनचंद जैन, मिताली प्रणयकुमार पुजारी, प्रज्वल कुंदन नलवडे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष पंडितराव शिंदे , उपाध्यक्ष निरज मुनोत , सचिव ॲड. जे. डी. काटकर, सहसचिव प्रा. डॉ. शिवाजी शिंदे, मुख्याध्यापक जी. व्ही. सोमवंशी, पर्यवेक्षक व्ही. पी. देशमुख, ज्येष्ठ शिक्षक डी. आर. कोतकर, मार्गदर्शक शिक्षिका सविता ताड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम