कॉलेजमधून घरी जाणाऱ्या तरुणाचा अपघात ; उपचारादरम्यान झाला मृत्यू
पाळधीजवळील महामार्गावर झाला होता अपघात
कॉलेजमधून घरी जाणाऱ्या तरुणाचा अपघात ; उपचारादरम्यान झाला मृत्यू
पाळधीजवळील महामार्गावर झाला होता अपघात
जळगाव प्रतिनिधी
टहाकळी येथील एका तरुणाचा दुचाकीच्या भीषण अपघात महाविद्यालयातून गावी जाण्याकरिता निघालेल्या तरुणाचा अपघात होऊन तो जखमी झाल्याची घटना घडली होती. उपचारादरम्यान शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजतात्याचे निधन झाले. जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महेश संजय पाटील वय-१८, रा. टहाकळी ता.धरणगाव असे मयत झालेल्या महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे.
महेश हा पाळधी येथील नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी अर्थात एनएमकेसी या महाविद्यालयात डिप्लोमा करत होता. गुरुवारी २३ जानेवारी रोजी दुपारी कॉलेज सुटल्यानंतर महेश हा घरी जाण्यासाठी पायी निघाला होता. त्याचवेळी त्यांच्या गावात राहणारे प्रभाकर नामदेव पाटील वय-४२ हे देखील कंपनीतून घरी जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी रस्त्यामध्ये महेश भेटल्यावर त्याला देखील दुचाकीवर बसवून घेतले. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या बोगद्यातून जात असताना अज्ञात बोलेरो पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोर जोरदार धडक दिली. या धडकेत महेश हा गंभीर जखमी झाला, त्याला तातडीने जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता निधन झाले. घटनेबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत महेशच्या पश्चात आई छायाबाई, वडील आणि मोठी बहीण असा परिवार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम