
कोंगानगर येथे अंगावर वीज कोसळून तिघांचा मृत्यू
कोंगानगर येथे अंगावर वीज कोसळून तिघांचा मृत्यू
चाळीसगाव शेतात काम करीत असताना अंगावर वीज पडून दि.१५ रोजी दुपारी ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील कोंगानगर येथे घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालयात जावून चौकशी केली व नातेवाईक ग्रामस्थांचे सांत्वन केले. तसेच पंचनामे व इतर प्रशासकीय बाबी तात्काळ पूर्ण करून सदर मयांच्या वारसांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या, पावेळी प्रांताधिकारी प्रमोर हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, संदेश निकुंभ
उपस्थित होते.
याबाबत माहिती अशी की लखन दिलीप पवार (वय १४) रा. कोंगानगर, दशरथ उदल पवार (वय २४) रा. कोंगानगर, समाधान प्रकाश राठोड (वय हो९) रा. नेहर ता कन्नड जि. औरंगाबाद व दलीप उकल पवार (वय ३५) रा. कोंगानगर ता चाळीसगाव हे दि.१५ रोजी कोगानगर शिवारातील शेतात दुपारी शेती काम करीत होते. अचानक वीज पडल्याने यातील लखन दिलीप पवार (वय९४) रा कोंगानगर, दशरथ उयल पवार रा. कोंगानगर, समाधान प्रकाश राठोड रा. जेहर ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर गांचा मृत्यू झाला तर, तेथेच काम करीत असलेले दिलीप
उदल पवार रा. कोंगानगर ता चाळीसगाम हे जखमी झाले आहेत. घटना घडल्यानंतर तिम्ोंने मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले प जखमीवर ग्राचार करण्यात आले.
सदर घटनेची माहिती मिळाय चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालयात भाান घेवून मयतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. या दुर्दैवी घटनेने मयतांच्या कुटुंबीगांवर शोककळा पसरली असून, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास चाळीसगाय ग्रामीण पोलिस करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम