कोळगाव महाविद्यालयात कर्मवीर तात्यासाहेब पाटील पुण्यस्मरण सप्ताहाची सुरुवात

बातमी शेअर करा...

कोळगाव महाविद्यालयात कर्मवीर तात्यासाहेब पाटील पुण्यस्मरण सप्ताहाची सुरुवात

भडगाव : किसान शिक्षण संस्थेचे संस्थापक व समाजप्रबोधक कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या पुण्यस्मरण सप्ताहाचा प्रारंभ कला व विज्ञान महाविद्यालय, कोळगाव (ता. भडगाव) येथे सोमवार, दि. २३ सप्टेंबर रोजी झाला. या निमित्ताने संस्थापक तात्यासाहेबांसह स्व. कमलताई हरी पाटील यांच्या जयंतीप्रसंगी प्रतिमापूजन करून सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कै. दादासाहेब, कै. आण्णासाहेब व साधनाताई यांच्याही प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.

२३ ते ३० सप्टेंबर या आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य प्रा. सुरेश कोळी यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे आयोजन श्रीमती बोरसे मॅडम, प्रा. प्रशांत पाटील व प्रा. मनोज पाटील यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक बंधुभगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम