क्रीडा महोत्सव स्पर्धेत ८०० मिटर धावण्याच्या प्रकारात शेवंता पावरा हिला सुवर्णपदक

कुलगुरूंच्या हस्ते सत्कार

बातमी शेअर करा...

क्रीडा महोत्सव स्पर्धेत ८०० मिटर धावण्याच्या प्रकारात शेवंता पावरा हिला सुवर्णपदक

कुलगुरूंच्या हस्ते सत्कार

जळगाव ( प्रतिनिधी) गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने चंद्रपूर येथे झालेल्या आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेत ८०० मिटर धावण्याच्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची विद्यार्थिनी शेवंता पावरा हिला कुलगुरु प्रा. व्ही.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते विद्यापीठाच्या वतीने सरावासाठी स्पोर्टस् शुज देण्यात आले.

विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोककला महोत्सवात हे शुज तिला देण्यात आले. शेवंता पावरा ही शिरपुरच्या एच.आर.पटेल महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.प्रतिकुल परिस्थितीत ती धावण्याचा सराव करते. तिच्या या मेहनतीचे फळ क्रीडा महोत्सवात प्राप्त झाले. भविष्यात दैनंदिन सरावात खंड पडू नये यासाठी विद्यापीठाने नाईके कंपनीचे स्पोर्टस् शुज तिला उपलब्ध करुन दिले. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, व्य.प.सदस्य राजेंद्र नन्नवरे,प्रा.शिवाजी पाटील, ॲड . अमोल पाटील, नितीन झाल्टे, डॉ. पवित्रा पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अधिसभा सदस्य डॉ. ऋषीकेश चित्तम, अधिष्ठाता प्राचार्य डॉ. जगदीश पाटील, प्राचार्य एस.आर.पाटील, डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम