क्रीडा स्पर्धा तुमच्यातील नेतृत्व सिद्ध करते -कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी

के.सी.ई.एस. क्रीडा महोत्सव" २०२५ चे उदघाटन

बातमी शेअर करा...

क्रीडा स्पर्धा तुमच्यातील नेतृत्व सिद्ध करते -कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी

के.सी.ई.एस. क्रीडा महोत्सव” २०२५ चे उदघाटन

जळगाव I प्रतिनिधी

क्रीडा स्पर्धा तुमच्यातील नेतृत्व सिद्ध करते.सामाजिक माध्यमांच्या आहारी न जाता विद्यार्थ्यात नेतृत्व क्षमता,सांघिक भावना,अपयश पचवण्याची क्षमता यासह गुणवत्ता,सचोटी निर्माण व्हावी यासाठी खेळ महत्वाची भूमिका ठरत असतात. के.सी.ई.एस. क्रीडा महोत्सव याची साक्ष आहे.

के.सी.ई.सोसायटी सलंग्न संस्था अशा स्तुत्य क्रीडा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरेल यात शंका नाही असे प्रतिपादन खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित एकलव्य क्रीडा संकुल आयोजित “के.सी.ई.एस. क्रीडा महोत्सव” २०२५ चे उद्घाटक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यावेळी विद्यार्थांसोबत संवाद साधताना मनोगत व्यक्त केले. यावेळी के. सी. ई. सोसायटी उपाध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील, अॅड. प्रमोद पाटील, सचिव, डी. टी. पाटील, कोषाध्यक्ष, अॅड. प्रविणचंद्र जंगले, सह-सचिव, डॉ. शिल्पा बेंडाळे, डॉ. अशोक राणे, शशिकांत वडोदकर, सांस्कृतिक समन्वयक, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, प्रशासकिय अधिकारी, एकलव्य क्रीडा संकुल,डॉ. रणजित पाटील, क्रीडा शिक्षक, एस. व्ही. के. एम.तसेच के.सी.ई.सोसायटीच्या विविध विद्याशाखेचे प्राचार्य ,मुख्याध्यापक आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या आगमनानंतर ध्वजारोहण करण्यात आले. के.सी.ई.सोसायटीच्या विविध विद्याशाखेमधील एन.सी.सी.,एन.एस.एस.,स्काउट गाईड विद्यार्थी पथसंचालन आणि निरिक्षण करण्यात आले.

यावेळी क्रीडा ज्योत प्रज्वलन आणि क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर खेळाडूना शपथ विद्यार्थिनी सिद्धी पाटीलने दिली. स्वरदा संगीत विद्यालयाने सादर केलेल्या स्वागत गीत आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाला सुरवात झाली.

उत्कृष्ट पथ संचालन गुरुवर्य प.वी.पाटील विद्यालय सन्मानित करण्यात आले व प्रातिनिधिक स्वरुपात स्क्वश स्पर्धेतील शालेय स्तरावरील राष्ट्रीय पदक विजेता विद्यार्थी यश मराठे आणि बुद्धिबळ स्पर्धेतील शालेय स्तरावरील राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता हर्षवर्धन वले यांचा कुलगुरू व्ही.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना शुभेछ्या दिल्या.

संस्थेचा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन अश्या 22 शाखांचा विस्तार असून संस्थेत एकुण 22000 (बाविस हजार) विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. के. सी. ई. सोसायटीचे माननिय अध्यक्ष, आदरणिय प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू धरुन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताबरोबरच सर्वांगीण विकासावर सुद्धा लक्ष केंद्रित केले आहे.

के.सी.ई. सोसायटीतील सर्व विद्यार्थ्यांना एकलव्य क्रीडा संकुलातील उपलब्ध क्रीडा सुविधांचा लाभ मिळावा याकरीता के.सी.ई.एस. स्पोर्ट्स प्रमोशन योजना शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून कार्यान्वयीत करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी “के.सी.ई.एस. क्रीडा महोत्सव” चे आयोजन करण्यात आलेले आहे.असे आपल्या प्रास्ताविकेत श्रीकृष्ण बेलोरकर यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.योगेश महाले यांनी केले.यावेळी स्पर्धा यशस्वीतेसाठी राजेंद्र नारखेडे,प्रा.प्रवीण कोल्हे,प्रा.आकाश बिवाल,निलेश खडके,चंद्रलेखा जगताप,योगेश चव्हाण,लोकेश चौधरी ,साधू तागड आदीचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम