खंडणी, ड्रग्ज प्रकरणांवरून विशेष पोलिस महानिरीक्षकांची जळगाव पोलिसांना कठोर ताकीद

बातमी शेअर करा...

खंडणी, ड्रग्ज प्रकरणांवरून विशेष पोलिस महानिरीक्षकांची जळगाव पोलिसांना कठोर ताकीद

 

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून खंडणी आणि ड्रग्ज प्रकरणांमुळे चर्चेत असलेल्या जळगाव जिल्हा पोलिस दलाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बुधवारी (२१ मे २०२५) कठोर शब्दांत सुनावले.

जळगाव जिल्हा दौर्‍यादरम्यान पोलिस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला की, “चौकशी सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.

“या बैठकीला पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, कविता नेरकर यांच्यासह सर्व विभागीय पोलिस अधिकारी उपस्थित होते.

कराळे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यातील प्रलंबित गुन्हे, दैनंदिन गुन्ह्यांचा आढावा घेतला आणि आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सूचना दिल्या.

खंडणी आणि ड्रग्ज प्रकरणांवर विशेष लक्ष केंद्रित करत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.कराळे यांनी सांगितले की, ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध आरोप आहेत आणि ज्यांच्यावर पोलिस अधीक्षकांनी कारवाई केली आहे,

त्यांच्या चौकशीत दोषी आढळल्यास त्यांना कठोर शिक्षा होईल. ड्रग्ज प्रकरणातही चौकशीनंतर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.गावठी कट्ट्यांबाबत बोलताना, कराळे यांनी मध्य प्रदेश आणि जळगाव जिल्हा पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेचे कौतुक केले.

या मोहिमेअंतर्गत अनेक बेकायदा शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. सीमावर्ती जंगलात शस्त्रनिर्मिती होत असल्याने तेथे नियमित कारवाया सुरू असून, जळगाव पोलिसांनी यात सर्वाधिक यश मिळवल्याचे त्यांनी सांगितले. ही कारवाई यापुढेही अव्याहतपणे सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम