
खडसेंच्या ‘मुक्ताई’ बंगल्यातील चोरीचा उलगडा; तिघा चोरट्यांना आश्रय देणाऱ्या नातेवाईकाला अटक
खडसेंच्या ‘मुक्ताई’ बंगल्यातील चोरीचा उलगडा; तिघा चोरट्यांना आश्रय देणाऱ्या नातेवाईकाला अटक
जळगाव प्रतिनिधी -राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथराव खडसे यांच्या शिवराम नगरातील ‘मुक्ताई’ बंगल्यात झालेल्या धाडसी चोरीचा उलगडा रामानंद नगर पोलिसांनी केल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. तिघा चोरट्यांना आश्रय देणाऱ्या नातेवाईकासह पोलिसांनी आणखी एकाला अटक करून तपासात मोठी प्रगती साधली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरी करणारे चोरटे गुन्हा करण्यापूर्वी आणि केल्यानंतर मास्टर कॉलनीत राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांकडे थांबले होते. त्या नातेवाईक असलेल्या जियाउद्दीन शेख हुसनोद्दीन शेख (वय ३९, रा. मास्टर कॉलनी) याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली आहे. त्याचबरोबर चोरीसाठी वापरलेली एमएच १९ ईआर ५५३९ क्रमांकाची दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम