
खतांच्या नोंदी अपलोड न करणाऱ्या १२८ विक्रेत्यांना अल्टीमेटम
खतांच्या नोंदी अपलोड न करणाऱ्या १२८ विक्रेत्यांना अल्टीमेटम
कृषी विभागाचे सुनावणीद्वारे स्पष्ट निर्देश; दंडात्मक कारवाईची तयारी
जळगाव – जिल्ह्यात खत वितरण प्रणाली पारदर्शक आणि शिस्तबद्ध ठेवण्यासाठी कृषी विकास अधिकारी कार्यालयाने मोठी हालचाल सुरू केली असून, पोर्टलवर रिअल टाइम सेल नोंदी अपलोड करण्यात झालेल्या दुर्लक्षावर आता कठोर भूमिका घेण्याची तयारी दिसत आहे. विक्रीची अॅकनॉलेजमेंट वेळेत अपलोड न करणाऱ्या तब्बल १२८ खत विक्रेत्यांना कृषी विभागाने थेट अल्टीमेटम दिला आहे.
रिअल टाइम सेल नोंद अनिवार्य असतानाही अनेक कृषी सेवा केंद्रांकडून विक्रीची माहिती वेळेत पोर्टलवर न भरल्याचे आढळल्यानंतर जिल्हा कृषी विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानुसार या सर्व १२८ विक्रेत्यांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात दोन टप्प्यांत सुनावणी घेण्यात आली. सुनावणीत संबंधित विक्रेत्यांचे खुलासे स्वीकारण्यात आले असून आता खत नियंत्रण आदेश १९८५ व आवश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत दंडात्मक कारवाईची तयारी करण्यात येत आहे.
दरम्यान, अजूनही काही सेवा केंद्रांनी त्यांची विक्रीची Acknowledgement पोर्टलवर अपलोड केलेली नाही. अशांनी ती तात्काळ पूर्ण करून आवश्यक कागदपत्रांसह कृषी विभागाशी संपर्क साधावा, अन्यथा थेट प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा विभागाने दिला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम