
खदानीच्या पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू
चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील घटना
खदानीच्या पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू
चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील चहार्डी येथील खदानीच्या पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू झाला. ही घटना दि. २० रोजी दुपारी ४ वाजता घडली. चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
किरण लोटन राजवाडे (४०) असे मृत युवकाचे नाव आहे. किरण राजवाडे (धनगर) हे चोपडा आगारात वाहक म्हणून काम करत होते. किरण राजवाडे यांना नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालय, चोपडा येथे दाखल केले. डॉ. तृप्ती पाटील यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक तपास हवालदार ज्ञानेश्वर जवागे हे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम