
खदानीत पडून तरुणाचा मृत्यू
खदानीत पडून तरुणाचा मृत्यू
चोपडा तालुक्यातील दुर्दैवी घटना; परिसरात हळहळ
चोपडा : चहार्डी गावाजवळील पाण्याच्या खदानीत बुधवारी सकाळी मनोज भगवान पाटील (वय ३३, रा. गणपूर) यांचा तोल जाऊन पाण्यात पडून मृत्यू झाला. घटनेच्या वेळी पाटील हे मित्रांसोबत खदानीलगत थांबले होते. अचानक घसरून ते पाण्यात गेले आणि बाहेर येऊ शकले नाहीत. नागरिकांनी त्यांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम