खर्ची व रवंजे येथे 530 जनावरांचे लसीकरण पशुसंवर्धन विभाग व गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

बातमी शेअर करा...
खर्ची व रवंजे येथे 530 जनावरांचे लसीकरण
पशुसंवर्धन विभाग व गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम
रवंजे बू, ता. एरंडोल, गावपातळीवर पशुधनाच्या आरोग्य रक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरलेला एक उपक्रम रवंजेबू येथे यशस्वीपणे पार पडला. पशुसंवर्धन विभाग एरंडोल व गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. राहूल साळूंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुलसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
   या शिबिरामध्ये एकूण 530 जनावरांचे लसीकरण व औषधोपचार करण्यात आले.  शिबिरात सहभागी झालेल्या जनावरांचा सहभाग *गाय वर्ग (गाय, बैल, व ४ महिन्यांवरील वासरे) लम्पी स्किन डिजीज (LSD)  या गंभीर आजारावरील लसीकरण जंतनाशक औषधोपचार म्हैस वर्ग घटसर्प आजारावरील लसीकरण
शेळी वर्ग:
आंत्रविषार ( ETV) या प्राणघातक आजारावरील लसिकरण व जंतनाशक औषधी वाटप करण्यात आले.
शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट जनावरांचे रोगांपासून संरक्षण करणे, आजारांचे वेळेत निदान करणे आणि उत्पादनक्षमता वाढवणे हे होते. पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आणि त्यामुळे त्यांचे आरोग्य राखणे अत्यंत आवश्यक आहे.
शिबिरासाठी केवळ नाममात्र केसपेपर शुल्क मोठ्या जनावरासाठी ₹१० व लहान जनावरासाठी ₹५ आकारण्यात आले, जेणेकरून सर्व स्तरातील पशुपालकांना या सेवेचा लाभ घेता यावा.
शिबिराचे आयोजन बाजार पट्टा, रवंजे बू येथे सकाळी ८ वाजल्यापासून करण्यात आले होते. पशुपालक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमामध्ये पशु संवर्धन विभागाचे  श्री. यशवंत धवसे, सुदर्शन पाटील , विकास तायडे, पवन बडगुजर , भुषण बोरसे तसेच प्रशांत सुर्यवंशी (गांधी रिसर्च फाउंडेशन) यांनी शिबिर समन्वयक म्हणून पुढाकार घेतला. त्यांनी शिबिराचे नियोजन, जनजागृती, माहिती प्रसार आणि समन्वयाचे काम उत्कृष्टरीत्या पार पाडले. स्थानिक, जनावरांचे नियोजन व आवाहन पत्रके वाटणे अशा विविध पातळ्यांवर मोलाची साथ दिली.
  ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले असून, अशा उपक्रमांचे नियमीत आयोजन व्हावे अशी मागणी अनेक ग्रामस्थ व पशुपालकांनी यावेळी व्यक्त केली.
  या उपक्रमामुळे रवंजेबू गावात जनावरांचे रोगप्रसार टळण्यास मदत होईलच, शिवाय जनावरांची उत्पादकता व कामक्षमतेतही लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम