
खाटू श्याम येथून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपला भीषण अपघात; ११ ठार, ८ जखमी
खाटू श्याम येथून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपला भीषण अपघात; ११ ठार, ८ जखमी
दौसा येथे उभ्या ट्रकला धडक; मृतांमध्ये ७ मुलांचा समावेश
जयपूर: राजस्थानमधील प्रसिद्ध खाटू श्याम मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीचा दौसा येथे भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मालवाहू ट्रकला पिकअपने जोरदार धडक दिल्याने यात ७ चिमुकल्यांसह ११ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी भाविकांनी भरलेली पिकअप गाडी खाटू श्याम मंदिराकडून येत होती. दौसा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला या पिकअपची धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, पिकअपचा चक्काचूर झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ जयपूर येथील एसएमएस रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम