खानदेश कराओके सुपरस्टार जिल्हास्तरीय हिंदी गीत गायन स्पर्धेत सुरेल जल्लोष !

बातमी शेअर करा...
खानदेश कराओके सुपरस्टार जिल्हास्तरीय हिंदी गीत गायन स्पर्धेत सुरेल जल्लोष !

जळगाव : शहराचा सर्वांगीण विकास होत असताना दर्जेदार करमणुकीचीही तितकीच गरज आहे. “संगीत मन प्रसन्न आणि आनंदी करते. येथे इतक्या उच्च दर्जाचे कराओके सादरीकरण पाहून प्रत्येक श्रोता मंत्रमुग्ध झाला आहे”, असे गौरवोद्गार खासदार स्मिता वाघ यांनी काढले. खासदार स्मिता वाघ यांच्या सौ शांताबाई यांनी शाल बुके देऊन सत्कार केला त्यांना संसद पटू म्हणून गौरवण्यात आल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला

चिवास महिला मंडळ आणि युफोरिया-IFRM यांच्या संयुक्त विद्यमाने “खानदेश सुपरस्टार कराओके जिल्हास्तरीय हिंदी चित्रपट गीत गायन स्पर्धा” गंधे सभागृहात उत्साहात पार पडली. या भव्य स्पर्धेची दुसरी फेरी प्रचंड जल्लोषात रंगली.

पहिल्या फेरीत तब्बल १२५ स्पर्धकांनी ऑनलाइन ट्रॅक सादर केले होते. त्यातून निवडलेले ५० स्पर्धक प्रत्यक्ष रंगमंचावर कराओकेवर गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली. जुन्या-नव्या हिंदी चित्रपट गाण्यांच्या सादरीकरणाने सभागृहात सुरेल जल्लोष अनुभवायला मिळाला.

स्पर्धेचे उद्घाटन नयनतारा बाफना यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक चिवास च्या अध्यक्षा अनघा खारुल व IFRM युफोरिया चे अध्यक्ष संदिप जोशी यांनी केले. सूत्रसंचालन संगिता अजनाडकर व तृप्ती बाक्रे यांनी केले. विशेष आकर्षण म्हणजे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांनी स्वतः कराओकेवर गाणे सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.

दुसऱ्या फेरीचे सूत्रसंचालन युफोरिया सचिव डॉ. राहुल पांडे व नेहा नैनानी यांनी केले, तर अंतिम फेरीचे सूत्रसंचालन युफोरिया संस्थापक चेअरमन डॉ. विजय शास्त्री यांनी खुमासदार पद्धतीने केले.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून नामवंत संगीतप्रेमी उपस्थित होते –
१) श्री. किरण सोहळे (भुसावळ)
२) सौ. पद्मजा नेवे (जळगाव)
३) सौ. कविता दिक्षित (जळगाव)
४) श्री. ज्ञानेश वर्मा (नाशिक)
५) महागुरू श्री. संजय पत्की (जळगाव)

परीक्षकांनी स्पर्धकांच्या सादरीकरणाचे कौतुक करत मौल्यवान सूचना दिल्या.

🎤 निकाल जाहीर :
• (वयोगट 20 ते 40 वर्षे)
प्रथम : श्री. अमेय विलास कुलकर्णीने (जळगाव)
द्वितीय : कु. निकिता गणेश जोशी (जळगाव)
तृतीय : श्री. किरण सिद्धार्थ मोरे (वरणगाव)
उत्तेजनार्थ : सौ. शुभांगी चंदनकुमार असोदेकर (जळगाव)
• (वयोगट 41+ वर्षे)
प्रथम : श्री. रवींद्र श्रीराम ठाकूर (जळगाव)
द्वितीय : श्री. पंकज छगन पाटील (चोपडा)
तृतीय : श्री. प्रकाश लक्ष्मण हंसकर (भुसावळ)
उत्तेजनार्थ : श्री. अर्जुन सीताराम सावळे (जामनेर)

विजेत्या गायक-गायिकांना प्रथम पारितोषिक रु. 5000 / ,द्वितीय पारितोषिक रू. 3000/, व तृतीय पारितोषिक रू. 2000/ तसेच आकर्षक ट्रॉफी, व प्रमाणपत्रे असे दोन्ही गटातून महागुरू संजय पत्की यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर शांता वाणी,चिवास च्या अध्यक्षा सौ.अनघा खारूल,युफोरिया चे अध्यक्ष संदीप जोशी , प्रोजेक्ट  कोऑर्डिनेटर डॉ. सुशीलकुमार राणे, वैशाली वाणी, युफोरिया च्या सचिव सौ नेहा नैनानी व डॉ राहुल पांडे ,वैशाली अकोले आदी मान्यवर उपस्थित होते. वैशाली वाणी यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी IFRM युफोरिया सदस्य डॉ. विजय शास्त्री, तृप्ती बाक्रे, नितीन महाजन, गौरव मेहता, डॉ. नितीन दावलभक्त, डॉ. अपर्णा मकासरे, शिल्पा सफळे, स्मिता बाफना , डॉ स्मिता पाटील ,संजय इंगळे, सतीश मंडोरा यांच्यासह चिवास च्या अर्चना वाणी, वंदना गडे, दर्शना वाणी, उज्वला वाणी,पुष्पाताई साकळीकर, मालती वाणी ,ज्योती खारे, छाया गडे, अर्चना अट्रावलकर , स्वप्नाली अकोले व स्वरांजली अकोले  तसेच जळगाव चिवास शहर कार्यकारणीचे अध्यक्ष उमेश वाणी व अरुण वाणी व प्रकाश यावलकर व इतर सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले

या स्पर्धेच्या यशात प्रायोजकांचा सिंहाचा वाटा असून सातपुडा ऑटोमोबाईल्स चे किरण बच्छाव, RC बाफना ज्वेलर्स, तसेच SRV रिऍलिटी चे सत्यनारायण खटोड या सन्माननीय प्रायोजकांनी भव्यदिव्य आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.

या संस्मरणीय कार्यक्रमामुळे युफोरिया-IFRM व चिवास महिला मंडळ यांनी शहरातील संगीतप्रेमींना एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून दिले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम