खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची ८० वी वार्षिक सभा उत्साहात

बातमी शेअर करा...

खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची ८० वी वार्षिक सभा उत्साहात
शैक्षणिक यशाबद्दल शिक्षक-कर्मचाऱ्यांचा सन्मान

जळगाव – “शिक्षण द्या, प्रोत्साहन द्या आणि प्रबोधन करा” या ब्रीदवाक्यानुसार खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी सातत्याने शिक्षण प्रवाह गतिमान ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश पाटील यांनी सांगितले. ते संस्थेच्या ८० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश पाटील होते. यावेळी सचिव अ‍ॅड. प्रमोद पाटील, सहसचिव अ‍ॅड. प्रवीणचंद्र जंगले, कोषाध्यक्ष डी.टी. पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य शिल्पा बेंडाळे, प्राचार्य अशोक राणे, डॉ. हर्षवर्धन जावळे, भालचंद्र पाटील, रुपेश चिरमाडे, संजय प्रभुदेसाई, भरत अमळकर, अनिल राव आणि शैक्षणिक संचालक प्रा. मृणालिनी फडणवीस उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे माजी सचिव वसंतराव सरोदे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. त्यानंतर विविध शाखांतील प्राचार्य, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या विशेष कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. नुकतेच रुजू झालेल्या शैक्षणिक संचालक प्रा. मृणालिनी फडणवीस, प्राचार्य संजय भारंबे, उपप्राचार्य सुरेखा पालवे यांच्यासह डॉ. नितीन चौधरी, डॉ. रजनी सिन्हा, डॉ. कासीम आरसिवाला, डॉ. वासिम शेख, डॉ. मनोजकुमार चोपडा, डॉ. मनोज पांडे, डॉ. देवानंद सोनार, अमोल देशमुख, डॉ. अतुल इंगळे, डॉ. जयंंत इंगळे, स्वप्नील धांडे, प्रा. प्रियंका खरारे, दीपाली किरंगे, डॉ. वैभव मावळे, डॉ. अनिलकुमार मार्थी, विवेक मोरे, रजनी गोजरेकर, सुषमा कंची, संजय सुगंधी, प्रा. हर्षा देशमुख, कोमल जैन, कल्पेश महाजन, प्रा. स्वाती बाविस्कर, प्रा. राहुल पटेल, डॉ. प्रसाद कुलकर्णी, सचिन नाथ, मनीष महाले, डॉ. सुनील न्याती आणि रश्मी बहिर्गुणे यांचा सन्मान झाला.

या वेळी प्रा. मृणालिनी फडणवीस व सचिव अ‍ॅड. प्रमोद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राचार्य अशोक राणे यांनी मानले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम