खान्देश रोजगार मेळावा 2025 ला अभूतपूर्व प्रतिसाद

के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात् आयोजन

बातमी शेअर करा...

खान्देश रोजगार मेळावा 2025 ला अभूतपूर्व प्रतिसाद
के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात् आयोजन
जळगाव प्रतिनिधी

खान्देश् कॉलेज एजू केशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग महाविद्यालयात खान्देश रोजगार मेळावा 2025 चे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातर्फे खान्देशातील विद्यार्थ्यांना भव्य स्वरूपात रोजगार संधीचे आयोजन केले होते .तरुणाईला रोजगाराच्या आणि कौशल्य विकासाच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली. अशा प्रकारच्या विविध उपक्रमांतून शिक्षण, रोजगार आणि सामाजिक विकासाच्या संधी उपलब्ध करून त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न होता.एकाच छताखाली मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या एकत्र येऊन आयोजित करण्यात आलेला हा रोजगार मेळावा तरुणांसाठी आयुष्य बदलवणारा होता.

सकाळी 9.30 वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या मेळाव्यात 18 ते 45 वर्षे वयोगटातील तरुण – तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध होणार झाली . ग्राहक सेवा प्रतिनिधी, विक्री सहयोगी, तंत्रज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि यांसह विविध पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या.रोजगाराच्या शोधात असणाऱ्या अनेक युवकांसाठी सुवर्णसंधी चालून आली होती. या मेळाव्यात युवकांना त्यांच्या स्किलच्या अनुसार नोकरी देण्यात आली.कंपन्यांद्वारे मेळाव्यात इच्छुक उमेदवाराची मुलाखत घेतली जात होती.

संबंधित कंपनींनी अर्जकर्त्या उमेदवारांसाठी काही अटी शर्ती ठेवल्या आहेत. दहावी, बारावी,आयटीआय , डिप्लोमा,बी टेक,बीई,अभियांत्रिकी क्षेत्र,बीसीए,एमसीए, एमबीए,बीसीएस,एमसीएस पदवी किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार या मेळाव्यातील कोणत्याही कंपनीला अर्ज केले होते.या उपक्रमाने अनेक युवकांना रोजगार प्राप्ती होणार होता.या उपक्रमाला प्रमुख अतिथी के सी ई सोसायटीचे कोशाध्यक्ष श्री डी. टी पाटील तसेच सद्यस्य श्री संजय प्रभुदेसाई लाभले.उपस्थित रंगमंचावर प्रमुख मान्यवर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी,अकॅडमिक डीन् डॉ सी एस पाटील, डॉ ए.पी.जे. कलाम कौशल्य विकास विभाग प्रमुख प्रा.संजय पावडे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन् प्रा.गणेश पाटील ,ट्रेनिंग अँड प्लेसमेंट चे प्रा.मनीष महाले यांचे हस्ते दीपप्रज्वलन् करून कार्यक्रमाचे उदघाटन झाले .आयक्यूएसी समन्व्यक प्रा.कल्पेश महाजन तसेच प्रा.अविनाश सूर्यवंशी , एम बी ए विभाग प्रमुख प्रा.हर्षा देशमुख, एच आर विभाग प्रा.श्रुतिका घरडे यांचे हस्ते उपस्थित कंपन्यांचे गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

उमेदवाराकडून कोणतेही शुल्क याकरिता आकारण्यात आलेले नाही.रोजगार मेळाव्याचा मुख्य हेतू बेरोजगार युवकांना किंवा जे युवक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळवून देणे आहे असा हेतू होता . या मेळाव्यात अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला होता. अर्जकर्त्या उमेदवाराला त्याच्या स्किलनुसार काम देण्याचे कार्य या कंपन्या करतात. वाढती बेरोजगारीची समस्या दूर करणे हेच या रोजगार मेळाव्याचे ध्येय असते. अनेक शहरात रोजगार मेळावे भरवले जातात बेरोजगारीवर मात करण्यासाठी खान्देश रोजगार मेळावा २०२५ या उपक्रमा अंतर्गत विशेष प्रयत्न करीत आहेत. अधिकाधिक तरुणांना रोजगार देण्याचे ध्येय बाळगून के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट जळगाव तर्फे हा मेळावा घेण्यात येत आहे. तरूणासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांनी व्यक्त केले.उद्योजक व्हा आणी रोजगार देणारे व्हा असा सल्ला श्री संजय प्रभुदेसाई यांनी दिला.जळगाव शहरातून व ग्रामीण भागातून 1000 पेक्ष्या जास्त उमेदवारांनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज केले होते .40 पेक्षा जास्त कंपन्याचे प्रतिनिधी हजर होते .मुलाखती घेतल्या जाऊन 350 पेक्षा जास्त मुलांची निवड करण्यात आली .छबी इलेक्ट्रिकल प्रा.ली,किरण मशीन टूल्स,स्टार फॅब्रिकेटर्स,जस्ट डायल, रेडिओ मनभवन,स्टार कुलर्स अँड कन्डेन्सर्स प्रा.ली,फेमस ट्रेडर्स,उत्कर्ष स्मॉल फायनन्स बँक ली. विविध नामांकित कंपन्या उपलब्ध होत्या या कंपन्या मार्फत 3000 पेक्षा जास्त रोजगार संधी उपलब्ध होती.या उपक्रमाला के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत श्री नंदकुमार बेंडाळे यांचे मार्गदर्शन मिळाले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुषी ओचानी व स्नेहल चौधरी तर आभार प्रदर्शन प्रा मनीष महाले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रा.अविनाश सूर्यवंशी,प्रा.प्रवीण भंगाळे, प्रा.डॉ वीणा भोसले, प्रा.जगदीश पाटील, प्रा.राहुल पटेल,प्रा.के.बी पाटील,प्रा.सचिन भंगाळे, प्रा.विकास नारखेडे, प्रा.रेवती पाटील,प्रा.हेमंत धनंधरे, प्रा.तनया भाटिया,प्रा.स्नेहा पाटील ,प्रा.देवेंद्र पाटील प्रा.कोमल जैन, प्रा.नीरजकुमार पदमे,प्रा.स्वाती बाविस्कर,सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक वृंद, अशोक काळे ,शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी समन्व्यक हर्ष कोटेचा ,भावेश भन्साळी, नेहा लोंढे , रोहित सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम