खान्देशात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचि ग्वाही

विद्यापीठात झाला शैक्षणिक संवाद कार्यक्रम

बातमी शेअर करा...

खान्देशात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचि ग्वाही

विद्यापीठात झाला शैक्षणिक संवाद कार्यक्रम
जळगाव ( प्रतिनिधी) : खान्देशात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी इथल्या उद्योगांना आवश्यक असणारे मनुष्यबळ तयार करणारे अभ्यासक्रम उद्योजक आणि विद्यापीठ यांच्या समन्वयातून तयार करण्याची ग्वाही शनिवार रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अतिथीगृहात झालेल्या शैक्षणिक संवाद कार्यक्रमात देण्यात आली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने शनिवार दि. १५ मार्च रोजी जळगाव,धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यातील उद्योजक प्रतिनिधीसमवेत शैक्षणिक संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंचावर जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री. अशोक जैन, स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजचे संचालक श्री. दीपक चौधरी, महाराष्ट्र शासनाच्या ऑन जॉब ट्रेनिंग सुकाणू समितीचे सदस्य श्री. भरत अमळकर, कुलगुरु प्रा. व्ही.एल.माहेश्वरी व व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे हे होते.

यावेळी कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी सांगितले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यात अधिक सहकार्य असावे असे अधोरेखीत केले आहे. त्या-त्या भागातील उद्योगांना आवश्यक असणारे मनुष्यबळ तयार व्हावे यासाठी त्या पध्दतीचे अभ्यासक्रम विकसित करुन कौशल्यावर भर देण्यात आला आहे. कारण आता पदवी व पदव्युत्तर स्तरावर विद्यार्थ्यांना ॲप्रेंटीसशिप बंधनकारक करण्यात आली आहे. विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची रोजगाराची भूक शमविणेसाठी, त्यांना प्रशिक्षण व रोजगाराची संधी प्राप्त व्हावी या सर्व पाश्वभूमीवर विद्यापीठाशी संलग्नीत तिनही जिल्ह्यांमधील उद्योजकांसमवेत संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे सांगून या कार्यक्रमासाठी ५७ उद्योग-व्यवसायाच्या सुमारे ७५ प्रतिनिधींनी विद्यापीठाच्या हाकेला प्रतिसाद दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. उद्योगांना लागणारे मनुष्यबळ तयार करण्यासाठी विद्यापीठातर्फे उद्योजकांना विश्वासात घेऊन काही अभ्यासक्रम व काही अल्प कालावधीचे कोर्सेस तयार करण्याचा संकल्प असून नव्या बृहत आराखडयात सर्व घटकांना शिक्षणाची समान संधी मिळण्यासाठी उपाययोजना व तरतूदी करण्यात आल्या असल्याची माहिती दिली. या सभेत उद्योजकांनी सूचना कराव्यात असे आवाहन केले.

प्रमुख अतिथी अशोक जैन यांनी सांगितले की, विद्यापीठाने राष्ट्रीय पातळीवर व जागतिक पातळीवर चांगली कामगिरी केली आहे. विद्यापीठाने खान्देशातील तरुणांना प्रशिक्षण व रोजगार उपलब्धतेबाबत पुढाकार घेतला असून याव्दारे आपल्याला हवे तसे प्रशिक्षीत मुनष्यबळ उपल्ब्ध होतील त्याकरीता उद्योजक प्रतिनिधींनी यास प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले.

स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजचे दीपक चौधरी यांनी सांगितले की, पदवीधर तरुणांना नोकरीची संधी दिल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव नसतो. त्यामुळे त्यांना प्रशिक्षण देण्यात एक ते दीड वर्ष जातात. शिक्षण घेत असतांनाच विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये प्रशिक्षणासाठी एक वर्ष पाठविल्यास उद्योगांना प्रशिक्षीत मनुष्यबळ सहज उपलब्ध होईल व त्याचा फायदा उद्योग व पदवीधर तरुण या दोघांना होईल.

महाराष्ट्र शासनाच्या ऑन जॉब्‍ ट्रेनिंग सूकाणू समितीचे सदस्य श्री. भरत अमळकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये इंटर्नशिप उपलब्ध करणे बाबत भरीव तरतूद केली आहे. इंटर्नशिप काळातील विद्यावेतनाचा काही आर्थिक भार शासन उचलणार असल्याने उद्योग व्यावसायिकांनी विद्यापीठाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद द्यावा व प्रशिक्षित मनुष्यबळ तयार होण्यास व खान्देशातील तरुणांना खान्देशातच रोजगार कसा उपलब्ध होईल याबाबत विद्यापीठास सहकार्य करावे.

व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी उद्योग व्यावसासिकांनी विद्यापीठाचे मित्र म्हणून काम करावे. विद्यापीठाने नव्या शैक्षणिक धेारणाच्या अनुषंगाने विद्यापीठ सुरु करीत असलेल्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देऊन प्रशिक्षीत मनुष्यब्ळ निर्मितीला सहकार्य करुन या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी असे सांगितले.

या संवाद कार्यक्रमास उपस्थित उद्योजक, उद्योजक प्रतिनिधी व व्यावसायिक यांनी प्लॅस्टीक, केमीकल, फूड, सोलर आदी उद्योग त्यांच्या व्यवसायानुसार आवश्यक अभ्यासक्रम विद्यापीठाने तयार करावेत, एसईपी इआरपी या संगणक सॉफ्टवेअरचे ज्ञान विद्यार्थ्यांना द्यावे, दालमिल उद्योगासाठी प्रशिक्षीत मनुष्यबळ उभारण्यासाठी‍ि विद्यार्थ्यांकरीता मॉक्‍ ड्रील करीता दालमिलचे मॉडेल देण्याची तयारी दर्शविली, इनोव्हेटीव कोर्सेस तयार करावेत, सायबर सुरक्षेवर आधारित कोर्सेस तयार करावेत, एक वर्ष पुस्तकी शिक्षण-एक वर्ष उद्योगात काम व एक वर्ष प्रात्यक्षिक असा अभ्यासक्रम तयार करावा, विद्यार्थ्यांना मुलाखत तंत्र, सॉफ्ट स्कीलचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांनाच द्यावे, प्रशासकीय कामांची माहिती होण्यासाठी प्रत्यक्ष विविध कार्यालयात त्यांना इंटर्नशिपकरीता पाठवावे तसेच मुलाखतीवेळी अपेक्षित पगार किती सांगावा याबाबत अल्पमुदतीचा कोर्स तयार करावा अशा विविध सुचना करुन विद्यापीठातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिपकरीता व पात्र विद्यार्थ्यांना रेाजगाराची संधी देण्याचे आश्वासन दिले. या चर्चेत नितीन बंग, विजय बागलीवाले, अतुल कोगटा, रवि कोंबडे, अनीष शहा, हरीश यादव, संदीप काबरा, नितीन गावंडे, अनील कांकरीया, निलेश तेली, पोरस संचेती, सुमीत पाटील, हितेश आगीवाल, गिरीश खडके, श्री.सक्सेना आदी उद्योजक प्रतिनिधींनी आपली मते मांडली.

या संवाद कार्यक्रमाचा समारोप करतांना प्रा.एस.टी.इंगळे सर्व उद्योजकांना आवाहन केले की, ऑन जॉब ट्रेनिंग करीता विद्यापीठास सहकार्य करावे. कुलगुरुंनी शैक्षणिक वर्षापासून तीन वर्ष वर्गातील शिक्षण व एक वर्ष उद्योगांमध्ये प्रशिक्षण असे पदवीस्तरावरील कृषिक्षेत्राशी निगडीत आणि रासायनिक उद्योगांशी निगडीत असे दोन अभ्यासक्रम तयार करुन सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. तसेच उद्योग व्यावसायिकांनी या सभेत केलेल्या सुचनांनुसार अल्पकालावधीचे काही कोर्सेस सुरु करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नवसंशोधन, नवोपक्रम व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश जावळेकर यांनी केले. विद्यापीठातील इंटर्नशिप व प्लेसमेंटची माहिती प्रा.रमेश सरदार यांनी दिली तर आभार व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या संचालिका प्रा. मधुलिका सोनवणे यांनी मानले. संवाद कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी उद्योजक प्रतिनिधींसमवेत विद्यापीठाच्या प्रशाळांचे संचालक प्रा. दीपक दलाल, प्रा.भूषण चौधरी, प्रा. विकास गिते, डॉ. उज्जवल पाटील, डॉ. विशाल पराते, प्रा.समीर नारखेडे, प्रा. के.एस. विश्वकर्मा यांनी अभ्यासक्रमांची माहिती दिली. यावेळी कुलसचिव डॉ. विनोद पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. म.सु.पगारे, डॉ.पवित्रा पाटील, प्रा.अनिल डोंगरे उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम