खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी पाल्यांचे हित जोपासणारी- शिवसेना नेते प्रा.नरेंद्र खेडेकर

मनोबल अभ्यासिका केंद्रातील विद्यार्थ्यांनी दिल्या राणा दिलीपकुमार सानंदा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

बातमी शेअर करा...

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी पाल्यांचे हित जोपासणारी- शिवसेना नेते प्रा.नरेंद्र खेडेकर

मनोबल अभ्यासिका केंद्रातील विद्यार्थ्यांनी दिल्या राणा दिलीपकुमार सानंदा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

खामगाव;- खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या संकल्पनेतुन लोकनेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांच्या जयंतीदिनापासुन मागील 13 वर्षापासुन शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी अभ्यासिका केंद्र सुरु करण्यात आले आहे.अत्यंत शांत आणि सुरक्षीत वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासात कुठलाही अडथळा येत नाही. विद्यार्थ्यांना एखाद्या खाजगी अभ्यासिकेमध्ये सुध्दा मिळत नसतील इतक्या चांगल्या सुविधा या मनोबल अभ्यासिकेमध्ये पुरविल्या जात आहे.बाजार समित्या हया शेतकऱ्यांचे हित जपतात परंतू खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांसोबतच त्यांच्या पाल्यांचे सुध्दा हित जोपासणारी बाजार समिती आहे असे प्रतिपादन शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी केले. दि.1 मे 2025 रोजी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी यार्डसंकुल मधील मनोबल अभ्यासिका केंद्रामध्ये माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला सत्कारमुत माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा,माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा, शहर अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, तालुकाध्यक्ष मनोज वानखडे,शेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले,खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे,संचालक संजय झुनझुनवाला, महिला काँग्रेसच्या शहरअध्यक्षा सौ.सुरजितकौर सलुजा,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष श्रीराम खेलदार,सौ.वर्षाताई इंगोले,तुषार चंदेल यांच्यासह जैन संघटनेचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना प्रा.नरेंद्र खेडेकर म्हणाले की, अभ्यासिका मनोबल अभ्यासिका केंद्रामध्ये विद्यार्थ्यांनी जिदद्‌‍ आणि चिकाटी अंगी बाळगून अभ्यास हेच आपले ध्येय हा उदद्ेश डोळयासमोर ठेवुन स्पर्धा परिक्षाची तयारी करावी आणि त्या माध्यमातुन आपले उज्वल भविष्य घडवावे असे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सांगितले की,शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी शिक्षणाच्या चांगल्या सोयी,सुविधा उपलब्ध्ा व्हाव्या व विद्यार्थ्यांना आपल्या आई-वडीलांची स्वप्न पुर्ण करता यावे यासाठी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी निःशुल्क मनोबल अभ्यासिका केंद्र सुरु केले आहे.अभ्यासिका केंद्राच्या माध्यमातून शेतकरी पाल्यांना अधिक चांगले बनविण्यासाठी त्यांना नवीन महत्वपुर्ण मासिके, दैनिक वृत्तपत्रे आणि विविध क्षेत्रातील स्पर्धा पुस्तके वेळोवेळी मोफत उपलब्ध करुन देण्यात येतात.या मनोबल अभ्यासिका केंद्राच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांची शासकीय आणि निमशासकीय सेवेमध्ये निवड झालेली आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे असे सांगुन त्यांनी विद्यार्थ्यांनी सुदृढ शरीरासह अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत कराव असे आवाहन राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.
यावेळी मनोबल अभ्यासिका केंद्रामधील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोबल अभ्यासिका केंद्राच्या माध्यमातून अतिशय चांगले नियोजन करुन वेळोवेळी स्पर्धा पुस्तके व मोफत सुविधा देवुन विद्यार्थ्यांच्या प्रत्येक अडचणी सोडविले जात असल्याचे सांगुन विद्यार्थ्यांसाठी मनोबल अभ्यासिका केंद्रामध्ये सर्व सोयी सुविधा पुरविल्याबदद्ल माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासोबत बाजार समितीच्या सभापती व सर्व संचालक वृंदांचे विद्यार्थ्यांनी मनापासुन आभार मानले.
याप्रसंगी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसाडे व संचालक वृंदांनी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवसानिमित्त शाल व पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला तसेच शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी सुध्दा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचे शाल व पुष्पहार घालुन अभिष्टचिंतन केले तसेच मनोबल अभ्यासिका केंद्रामधील विद्यार्थ्यांसोबत माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला.अनेक विद्याथ व मान्यवरांनी पुष्पगुच्छ देवुन राणा दिलीपकुमार सानंदा यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.मनोबल अभ्यासिका केंद्रातील विद्यार्थ्यांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाडु वाटप करुन त्यांचे तोंड गोड करण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम