
खासगी रुग्णालयाच्या बाथरुममध्ये पडून महिलेचा मृत्यू
खासगी रुग्णालयाच्या बाथरुममध्ये पडून महिलेचा मृत्यू
जळगाव : खासगी रुग्णालयाच्या बाथरुममध्ये पडून अनिता अरुण पालिवाल (वय ५३, रा. लोहारा, ता. पाचोरा) यांचा मृत्यू झाला. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाचोरा तालुकयातील लोहार येथील अनिता पालिवाल यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी बाथरुममध्ये गेल्या असता तेथे त्या पडल्या. त्यामुळे त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिता वाघमारे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम