
खिडकीतून हात घालून लॅपटॉप लंपास; हरिविठ्ठलनगरात चोरी
खिडकीतून हात घालून लॅपटॉप लंपास; हरिविठ्ठलनगरात चोरी
जळगाव प्रतिनिधी शहरातील हरिविठ्ठलनगरातील एका घराच्या गॅलरीतून खिडकीत हात घालून चोरट्याने थेट ३४ हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप लांबविला. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळीचे वातावरण आहे. आहे.
योगेश गौतम सपकाळे (२६) हे शिक्षणासाठी लॅपटॉपचा वापर करीत असून तो गॅलरीत ठेवलेला होता. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने खिडकीतून हात टाकत लॅपटॉप उचलून नेला. चोरी लक्षात येताच सपकाळे यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक मनोज सुरवाडे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम