
खूनातील तीन संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
खूनातील तीन संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
जळगाव : अनैतिक संबंधाच्या वादातून खूनझालेल्या आकाश पंडीत भावसार (वय २७, रा. अशोक नगर) या तरुणाच्या खूनप्रकरणी तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तिघांचीही कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
अनैतिक संबंधाच्या वादातून आकाश भावसार याचा खून झाल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. या प्रकरणी अटकेतील अजय मोरे, चेतन सोनार व कुणाल उर्फ सोनू चौधरी या तिघांना अटक करण्यात आली होती. त्या तिघांनी दि. १३ मे रोजी पोलिस कोठडीची मुदत संपली. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम