खेळता खेळता १२ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू

बातमी शेअर करा...

खेळता खेळता १२ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील विद्यानगर परिसरात सोमवारी (७ जुलै) दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. खेळता खेळता गळ्यात दोरी अडकून हार्दिक प्रदीपकुमार अहिरे (वय १२) या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रामानंदनगर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक हा रावेर तालुक्यातील केऱ्हाडे येथील शिक्षक प्रदीपकुमार अहिरे यांचा दत्तक मुलगा होता. २०१५ साली पुण्यातील एका संस्थेमधून त्यांनी हार्दिकला दत्तक घेतले होते. पत्नी आणि दोन मुलांसह ते विद्यानगरमध्ये वास्तव्यास होते. हार्दिक त्यांच्या कुटुंबाचा लाडका आणि आनंदाचा केंद्रबिंदू होता.

सोमवारी दुपारी हार्दिक शाळेतून परतल्यानंतर आईसोबत चहा-बिस्किटे घेतली. त्यानंतर आई लहान भाऊ प्रसादला ट्युशनला घेऊन गेली. दरम्यान, हार्दिक शेजारी राहणाऱ्या पदमसिंह राजपूत यांच्या घरी खेळायला गेला. याचवेळी दुर्दैवाने छताला लावलेल्या दोरीचा फास त्याच्या गळ्याभोवती अडकला आणि गंभीर प्रकार घडला. या घटनेच्या वेळी घरात कोणीही उपस्थित नव्हते.

काही वेळाने शेजारी राहणाऱ्या एका महिलेला हार्दिक लटकल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ आरडाओरड केली. घटनेची माहिती मिळताच हार्दिकच्या आईने घटनास्थळी धाव घेतली. तातडीने त्याला शहरातील खासगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

या घटनेने अहिरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाईकांचा आक्रोश आणि परिसरातील नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू आहेत. एक निरागस जीव असा अचानक निघून गेल्याने विद्यानगर परिसरात शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम