
खेळातूनच सांघिकतेची प्रेरणा मिळते – रोहित पवार
खेळातूनच सांघिकतेची प्रेरणा मिळते – रोहित पवार
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धचे उद्घाटन
जळगाव प्रतिनिधी : जीवनात कोणतेही मोठे कार्य एकट्याने करता येत नाही त्यासाठी संघ सोबत हवा असतो. खेळातूनच ही सांघिकतेची प्रेरणा मिळते. ही खेळांतील सांघिकता जीवनातही अंगिकारावी व शिक्षणासोबतच खेळातून देशहित जोपासावे. असा सल्ला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व आमदार रोहित पवार यांनी खेळाडूंना दिला.
अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई-१७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेचे उद्घाटन रोहित पवार यांच्याहस्ते झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कौन्सिलचे सदस्य अतुल जैन, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस.टी. खैरनार, सचिव अरविंद देशपांडे, खजिनदार राजेंद्र लढ्ढा व पदाधिकारी, निवड कमिटीचे सदस्य संजय पवार, जैन स्पोर्टस अकॅडमीचे रवींद्र धर्माधिकारी, मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल व पदाधिकारी होते. अशोक जैन व अतुल जैन यांनी रोहित पवार यांचा सत्कार केला.
केरळ, दुबई आंतरराष्ट्रीय संघ असे मिळून १३ संघांतील २६० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
पहिल्याच सामन्यात महाराष्ट्राची विजयी सलामी
साखळी सामने सुरू झाले १५ षटकांचा सामनात आज महाराष्ट्र विरूद्ध उत्तराखंड असा सामना अनुभूती निवासी स्कूलच्या क्रीडींगणावर रंगला. ‘ए’ गटातील पहिल्या सामन्यात महाराष्ट्र नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. त्यात १५ षटकात १४५ धावांचा डोंगर उभा केला. महाराष्ट्र संघाने दिलेले आवाहन उत्तराखंडला पेलता आले नाही. त्यांचा संपूर्ण संघ ८७ धावांमध्ये गारद झाला. ५८ धावांना महाराष्ट्र संघाने विजयी आघाडी घेतली. आदी लुंगानी याने महाराष्ट्राकडून ११ चेंडूमध्ये २५ धावांची धुवांधार खेळी केली त्यासोबत दोन षटकांत केवळ ७ धावा देत एक गडी बाद केला त्यामुळे त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. त्याचा सम्मान रोहित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल, जैन ड्रीम स्पेस-मेहरूण तलावाजवळ तसेच एमके स्पोर्टस-सावखेडा च्या दोघंही मैदानांवर उद्याचे सामने रंगणार आहेत.
ए, बी, सी, डी अशा चार ग्रृप मध्ये सामने..
सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ही ए, बी, सी, डी अशा चार ग्रृप मध्ये सुरू आहे. यात ‘ए’ ग्रृपमध्ये पोर्टबेअर अंदमान निकोबार, महाराष्ट्र, ओव्हरसीस, उत्तराखंड, ‘बी’ गृप मध्ये ओडीसा, नॉर्थ वेस्ट, पश्चिम बंगाल, ‘सी’ ग्रृपमध्ये बिहार अॅण्ड झारखंड, तामिळनाडू पी. ए. निको, मध्यप्रदेश, ‘डी’ ग्रुपमध्ये कर्नाटक अॅण्ड गोवा, नॉर्थ इंडिया, केरळ संघांचा समावेश आहे. यात ‘ए’गटात चार तर बी, सी, डी तीन गटांमध्ये प्रत्येक तीन संघ खेळ आहेत. प्रत्येक गटातून प्रथम क्रमांकाचा संघ उपांत्य फेरीत लढत देईल. उपांत्य फेरीत ‘ए’ विरूद्ध ‘डी’ तसेच ‘बी’ विरूद्ध ‘सी’ असे सामने होतील. यातील विजेते अंतिम फेरीसाठी खेळतील.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम