खेळ हा विद्यार्थी जीवनातील महत्वाचा भाग – जे. पी. सपकाळे

भुसावळ तालुका शालेय क्रिकेट स्पर्धा उत्साहात; २२ संघांचा सहभाग

बातमी शेअर करा...

खेळ हा विद्यार्थी जीवनातील महत्वाचा भाग – जे. पी. सपकाळे

भुसावळ तालुका शालेय क्रिकेट स्पर्धा उत्साहात; २२ संघांचा सहभाग 

भुसावळ (प्रतिनिधी) : “खेळ हा विद्यार्थी जीवनातील निराशा नाहीशी करून उत्साह वाढवणारा असतो. प्रत्येक विद्यार्थ्याने खेळात भाग घ्यावा व तालुक्याचे नाव जिल्हा व राज्यस्तरावर उज्ज्वल करावे”, असे प्रतिपादन तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे. पी. सपकाळे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व बियाणी एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४, १७ व १९ वर्षाखालील तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धा बियाणी मिलिटरी स्कूल येथे उत्साहात संपन्न झाल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बियाणी एज्युकेशन ट्रस्टच्या सचिव डॉ. संगीता बियाणी यांनी भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे प्राचार्य डी. एम. पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे, वंदना ठोके यांच्यासह क्रीडा शिक्षक, पंच व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडांगण पूजनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

प्रास्ताविक डॉ. प्रदीप साखरे यांनी केले. यावेळी डॉ. संगीता बियाणी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की “खेळाडूंनी खेळाडूवृत्तीने स्पर्धा करावी व विजय-पराजय पचवून पुढे वाटचाल करावी. शिक्षकांनी निर्माण केलेल्या संधींचा योग्य उपयोग विद्यार्थ्यांनी करून घ्यावा”.

स्पर्धेतील विजेते संघ

१९ वर्षाखालील मुलं : बियाणी ज्युनिअर कॉलेज विजयी

१७ वर्षाखालील मुलं : डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल प्रथम, बियाणी मिलिटरी स्कूल द्वितीय, ताप्ती स्कूल तृतीय

१७ वर्षाखालील मुली : अहिल्यादेवी कन्या विद्यालय विजयी

१४ वर्षाखालील मुलं : बियाणी पब्लिक स्कूल, मिरगव्हाण विजयी, डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल उपविजेता, ताप्ती स्कूल तृतीय

स्पर्धेत एकूण २२ संघ आणि ३३० खेळाडू सहभागी झाले होते. पंच म्हणून डॉ. प्रदीप साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. एस. पाटील, मुकेश मोरे, हिम्मत पाटील, अर्जुन सनन्स, अझर शेख, तोशिब कुरेशी, विनय काळे यांनी काम पाहिले.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पी. आर. साखरे, डी. एम. पाटील, सर्व क्रीडा शिक्षक तसेच बियाणी स्कूलचे कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुकेश मोरे यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम