गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या निलेश कोळीची ठाणे कारागृहात रवानगी
जळगाव (प्रतिनिधी ) ;- कासोदा पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या निलेश कोळी याची एमपीडीए कायद्यानुसार ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील निलेश मिला कोळी राहणार उत्राण याच्याविरुद्ध कासोदा पोलीस स्टेशनला विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील सुधारणा न झाल्याने तो जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा ते गुन्हे करीत असल्याने त्याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाईचा प्रस्ताव देण्यात आला होता.
निलेश भिला कोळी याच्याविरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र गजरे यांनी प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवले असता या प्रस्तावाची पडताळणी करून पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एमपीडीए कायद्यानुसार कारवाई व्हावी यासाठी पाठविला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी निलेश भिला कोळी याच्याविरुद्ध ठाणे मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिल्याने त्याची रवानगी करण्यात आले आहे. या कारवाईत सपोनी निलेश राजपूत ,पोलीस उपनिरीक्षक दत्तू कोळे ,पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र गजरे ,पोलीस कॉन्स्टेबल राकेश खोडे ,श्रीकांत गायकवाड, नंदलाल परदेशी, धर्मेंद्र ठाकूर ,अखिल मुजावर, किरण गाडी लोहार ,अमोल गवळी, लहू हटकर, कुणाल देवरे आदींचा सहभाग होता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम