
गट ड भरती परीक्षेसाठी १९ मे रोजी परीक्षा केंद्र परिसरात बंदोबस्त; १०० मीटर क्षेत्रात निर्बंध लागू
गट ड भरती परीक्षेसाठी १९ मे रोजी परीक्षा केंद्र परिसरात बंदोबस्त; १०० मीटर क्षेत्रात निर्बंध लागू
जळगाव, राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर यांच्या अधीनस्त गट ड (वर्ग-4) सरळसेवा भरती परीक्षेसाठी १९ मे २०२५ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. आय.बी.पी.एस. कंपनीमार्फत ही परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असून, जळगाव येथील डॉ. केतकी पाटील ऑनलाईन परीक्षा केंद्र, गोदावरी इंजिनीअरिंग कॉलेज, एमआयडीसी, भुसावळ रोड येथे ती पार पडणार आहे.
परीक्षा काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी जळगाव यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार, १९ मे रोजी परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपासून ते संपेपर्यंत कोणालाही परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश परीक्षार्थी, परीक्षा कामकाजावर नियुक्त अधिकारी/कर्मचारी, पोलीस व होमगार्ड यांना लागू राहणार नाही.
तसेच, या परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने परीक्षेच्या कालावधीत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम