गणेशोत्सवानिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

महापौर सौ. जयश्री महाजन यांची उपस्थिती

बातमी शेअर करा...

 

 

जळगाव २२ ऑगस्ट |  : गणेशोत्सवाची चाहुल सर्वदूर सुरू झालेली आहे. यातच जळगाव जिल्ह्यात यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होण्याचे सकृत दर्शनी दिसत आहे आणि यामुळेच गणेश भक्तांचा उत्साह हा खरोखर द्विगुणित झालेला आहे. मात्र, यानिमित्ताने प्रशासनाची जबाबदारी ही वाढली आहे. गणेश मंडळांना पोलीस स्टेशनद्वारे देण्यात येणार्‍या परवानग्या, पेंडालसाठीची लाईट जोडणी यासह अनेक बाबी महत्त्वाच्या असून गणेश मंडळांना येणार्‍या अडचणीचे निवारण करुन त्यांच्या समस्या सोडविणे आवश्यक आहे. तसेच नेहमीप्रमाणे यंदाचे ही गणेशोत्सव उत्साहात व शांततेत संपन्न व्हावे, हीच प्रत्येकाची ईच्छा. याअनुषंगाने जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हा पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे सोमवार, दि.22 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी सर्व गणेश उत्सव समिती व मंडळाचे पदाधिकारी तसेच शांतता समिती सदस्यांच्या उपस्थितीत सार्वजनिक गणेशोत्सव 2022 संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.श्री.प्रविण मुंढे हे होते. बैठकीस मंचावर जळगाव शहराच्या प्रथम नागरिक व महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्यासह अपर पोलीस अधिक्षक श्री.चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.कुमार चिंथा व सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष श्री.सचिन नारळे यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी किशोर भोसले, मुकुंद मेटकर, भगत बालाणी राजेंद्र घुगे पाटील, अयाज अली, फारुख शेख यांच्यासह शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक, गणेशोत्सव समिती व मंडळाचे पदाधिकारी तसेच शांतता समितीचे सदस्य व पोलीस बांधव उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम