
गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद शांततेत पार पडल्याने पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांचा सत्कार
गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद शांततेत पार पडल्याने पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांचा सत्कार
जळगाव (प्रतिनिधी) – गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद-उन-नबी हे दोन्ही सण शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडल्याबद्दल सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनने पोलीस प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. दोन्ही सण जवळजवळ एकाच वेळी आल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते, पण त्यांनी केलेल्या अचूक नियोजनामुळे दोन्ही समाजांनी आपले सण उत्साहात साजरे केले.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या योगदानाबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने जळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक नितीन गणापुरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या भेटीत पोलीस प्रशासनाने दोन्ही मिरवणुका शांततेत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी फाउंडेशनचे सै. अयाज अली नियाज अली, सय्यद उमर, शेख जमील, सय्यद जावेद, कामिल खान, इमाम भाया, शफी ठेकेदार, शेख शब्बीर, असलम खान, शाहिद शेख यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम