
गणेश कॉलनीमधून वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावून चोरट्यांचे पलायन
गणेश कॉलनीमधून वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावून चोरट्यांचे पलायन
जळगाव : गणेश कॉलनीत राहणाऱ्या अरुणा रामदास कोलते (वय ६८) यांच्या गळ्यातील सुमारे १५ ग्रॅम सोन्याची पोत दोन अज्ञात चोरट्यांनी जबरी हिसकावून नेली. ही घटना मंगळवारी रात्री ९ वाजता घडली. चोरटे भरधाव दुचाकीवरून पसार झाले. वृद्ध महिलांनी तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम