गणेश विसर्जनाची मिरवणूक पाहण्यास गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरी ५ तोळ्यांचे  दागिने लंपास 

बातमी शेअर करा...

गणेश विसर्जनाची मिरवणूक पाहण्यास गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरी ५ तोळ्यांचे  दागिने लंपास 

 

जळगाव शहरातील घटना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद 

 

जळगाव:  गणेश विसर्जनाची मिरवणूक पाहण्यास गेलेल्या कुटुंबियांच्या घराचे कुलूप अज्ञात दोन चोरटयांनी तोडून घरातील कपाटामध्ये असलेले पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना शहरातील नारायण पार्क परिसरातील श्री अपार्टमेंटमध्ये ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान अपार्टमेंट परिसरात दुचाकीवरून आलेले दोन भामटे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

 

सविस्तर माहिती अशी कि, नारायण पार्क परिसरातील श्री अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रुचिता पवार या आपल्या कुटुंबियांसह जळगाव शहरातील गणेश विसर्जन दुपारी  ४ ते १० यावेळेस पाहण्यास गेल्या असता रात्री घरी परत आल्यानंतर मुख्य दरवाजाचे कुलूप चोरट्यांनी तोडलेले आढळून आले . आत बघितले  असता चोरटयांनी कपाट तोडून त्यातील सोन्याचे  ५ तोळे वजनाचे दागिने चोरून नेले.इतर सामान पलंगावर अस्ताव्यस्त केलेल्या अवस्थेत दिसून आला.   मात्र घरातील रोख रकमेला हात लावला नाही. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला असून, चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम