गरजू महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोटरीकडून ३० शिलाई मशीनचे मोफत वाटप

रोटरी जळगाव सेंट्रल आणि रॉयल्सचा संयुक्त उपक्रम; महिलांना रोजगाराची संधी

बातमी शेअर करा...

गरजू महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोटरीकडून ३० शिलाई मशीनचे मोफत वाटप

रोटरी जळगाव सेंट्रल आणि रॉयल्सचा संयुक्त उपक्रम; महिलांना रोजगाराची संधी

जळगाव (प्रतिनिधी) – गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव रॉयल्स यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३० च्या सहकार्याने ३० शिलाई मशीनचे मोफत वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम महिलांना स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता.

या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहप्रांतपाल जितेंद्र ढाके यांनी महिलांना आत्मनिर्भरतेचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी महिलांना केवळ मशीन न देता, आत्मनिर्भरतेकडे नेण्याचा हा एक मार्ग असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी प्रेसिडेंट एन्क्लेव्ह चेअरमन किशोर सूर्यवंशी होते. यावेळी महेंद्र रायसोनी, जळगाव सेंट्रल क्लबचे अध्यक्ष दिनेश थोरात, मानद सचिव समर्थसिंग पाटील, रॉयल क्लबच्या अध्यक्षा वर्षा रंगलानी, मानद सचिव स्नेहा ज्ञानचंदानी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या उपक्रमात गोविंद वर्मा यांनी १८ शिलाई मशीन देऊन मोठे योगदान दिले. त्याचप्रमाणे सुनील बाफना, संदीप मुथा, महेंद्र रायसोनी, विपुल पारेख, महेश राठी यांनी उर्वरित मशीनसाठी सहकार्य केले. कार्यक्रमात सहभागी महिलांनी या मदतीसाठी रोटरीच्या संयोजकांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पिंकी मंधान, डॉ. जयदीपसिंग छाबरा, जितू भोजवानी, साधना दामले, रत्नाकर पाटील आणि माधुरी थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले.

रोटरीचा हा उपक्रम म्हणजे केवळ मदत नव्हे, तर महिलांच्या आत्मसन्मानाला हातभार लावणारा प्रेरणादायी प्रयत्न असल्याचे उपस्थित मान्यवरांनी म्हटले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम