
गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास; महिला व अल्पवयीन मुलगी पोलिसांच्या जाळ्यात
गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास; महिला व अल्पवयीन मुलगी पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील नवीन बस स्थानकावर रविवारी (२५ मे) दुपारी ३ वाजेच्या सुमारास गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी एका महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जानकी नगरातील लक्ष्मी प्रमोद चौधरी (वय ३५) या चाळीसगावला जाण्यासाठी रविवारी दुपारी नवीन बस स्थानकात आल्या होत्या. त्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत एका महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून लंपास केले. चोरी झाल्याचे लक्षात येताच लक्ष्मी चौधरी यांनी तात्काळ जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित महिला घुरपता अक्षय भोसले (वय ३०) व तिच्या अल्पवयीन मुली (दोघी रा. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांना ताब्यात घेतले. गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस नाईक कमलेश पवार करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम