गलंगी सबयार्डात भुसार मालाच्या पहिल्या जाहीर लिलावाचा शुभारंभ

बातमी शेअर करा...

गलंगी सबयार्डात भुसार मालाच्या पहिल्या जाहीर लिलावाचा शुभारंभ

चोपडा प्रतिनिधी:चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गलंगी सबयार्डात भुसार मालाच्या पहिल्या जाहीर लिलावाचा सोमवार, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी  शुभारंभ संपन्न झाला. यावेळी चोपडा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आण्णासो चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. लिलावाचे औपचारिक उद्घाटन सभापती नरेंद्र पाटील यांनी नारळ फोडून व पूजन करून केले.

सदर लिलावामुळे गलंगी परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, कारण यापूर्वी त्यांना आपला भुसार माल विक्रीसाठी अमळनेर किंवा शिरपुर बाजार समितीत जावे लागायचे, ज्यामुळे वाहतुकीवर खर्च आणि वेळेचा अपव्यय होत असे. आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेताजवळील गलंगी सबयार्डात माल विक्री करता येणार असल्याने त्यांचे समाधान व्यक्त होत आहे.

सभापती नरेंद्र पाटील यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की, “गलंगी सबयार्डात लिलाव सुरू करणे हे बाजार समितीचे उद्दिष्ट होते. आमदार आण्णासो चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाच्या प्रयत्नांमुळे आज हा दिवस शक्य झाला. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.” त्यांनी भविष्यात अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक शेतमाल गलंगी सबयार्डात विक्रीस आणण्याचे आवाहन केले.

सदर लिलाव शुभारंभ प्रसंगी उपसभापती विनायकराव चव्हाण, संचालक घनश्याम पाटील, अनिल पाटील, वसंत पाटील, विजय पाटील, नंदकिशोर पाटील, शिवराज पाटील, मनोज सनेर, मिलींद पाटील, किरण देवराज, सुनिल जैन, सुनिल अग्रवाल, नितीन पाटील, भरत पाटील व सचिव रोहिदास सोनवणे, तसेच कर्मचारी वर्ग व गलंगी परिसरातील शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम