
गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या
गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या
मजरेहोळ येथील घटना
जळगाव प्रतिनिधी एका ७२ वर्षीय वृद्धाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना चोपडा तालुक्यातील मजरेहोळ येथे ८ डिसेंबर रोजीउघडकीस आली.. प्रभाकर तुमडू पाटील (वय ७२)
असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. घरातील लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम