गावठी कट्टा बाळगणाऱ्याला LCB ने केली अटक

गावठी पिस्तूल व 8 जिवंत काडतुसे जप्त 

बातमी शेअर करा...

गावठी कट्टा बाळगणाऱ्याला LCB ने केली अटक

गावठी पिस्तूल व 8 जिवंत काडतुसे जप्त 

जळगांव l प्रतिनिधी

वरणगाव शहरात गस्त घालत असतांना पोना श्रीकृष्ण देशमुख यांना वरणगाव शहराजवळ राज उर्फ ​​मनोज हा गावठी कट्टा घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली

त्यावरून LCB चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पथक तयार करून राज उर्फ ​​मनोज रा. याला तात्काळ अटक केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, जळगांव शहरासह जिल्ह्यात अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे इसम दहशत निर्माण करण्याच्या हेतूने अवैध बंदुकीचा वापर करीत असून

गावठी
गावठी

त्यांचेबाबत गोपनीय माहिती काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आदेश दिले होते.

त्यावरून पोना श्रीकृष्ण देशमुख हे वरणगाव शहरात गस्त घालत असताना त्यांना वरणगाव शहराजवळ राज उर्फ ​​मनोज हा गावठी कट्टा घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

त्यानुसार LCB चे वरिष्ठ पो. नि. बबन आव्हाड, यांनी पोह प्रीतम पाटील, पोना श्रीकृष्ण देशमुख नियुक्ती LCB जळगाव यांचा समावेश असलेले पथक तयार करून राज उर्फ ​​मनोज रा. याला तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर राज उर्फ ​​मनोज हा वरणगाव शहरातील तिरंगा चौकातील स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स येथील राज मोबाईल रिपेअरिंग या दुकानाजवळ आढळून आला,

त्याला त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने आपले नाव राज उर्फ ​​मनोज सुरेश शिंदे वय 39, रा.  रामपेठ वरणगाव ह.मु. शिवराय चौक फुलगाव वरणगाव ता. भुसावळ असे असून त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता

त्याच्या ताब्यात रू. 25,000/- किमतीचे गावठी बनावटीचे 1 पिस्तूल व 8,000/- रुपये किंमतीचे 8 जिवंत काडतुसे सापडल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आणि

त्याच्यावर सीसीटीएनएस क्रमांक 165/2024 शस्त्र अधिनियम 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास वरणगाव पो स्टे. चे ताब्यात देण्यात आले.

सदर गुन्ह्याची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, राजकुमार शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुक्ताईनगर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

हे हि वाचा👇

पांडुरंगाच्या कार्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम